ऐका मतदार भावांनो…बंधु भगिणीनो…प्रिय जणांनो..या पोवाडा गीतातून जनजागृती
चाकूर (गोविंद काळे) : चाकूर तालुक्यातील सुगाव येथे दि.२४ रोजी सायंकाळी स्वीप पथकाच्या वतीने विविध गीतांच्या माध्यमातून मतदानाची लोकगीते,पोवाडा,लावणी,भारुड,गोंधळ सादर करुन मतदार जनजागृती केली.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येकाने आपला हक्क बजवावा.नौकरीसाठी असलेले शहरातील आपल्या आपत्यांना मतदान सारख्या पवित्र कार्यासाठी आमंत्रीत करावेत. सुगाव बरोबरच प्रत्येक गावातील शहरात असलेल्या मतदारांना मुलगा,मुलगी,भाऊ इष्टमित्र यांना बोलावून घेऊन या लोकशाहीच्या महा उत्सवात सहभाग नोदंविण्यासाठी पथकाने आवाहन केले.
गावातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करावे असे यावेळी मत मांडले.
या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार उज्वला पांगरकर चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव,शिक्षणाधिकारी नागेश मापारी, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,दिलिप हैबतपुरे यांच्या आदेशानुसार मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य राज्यपुरस्कार प्राप्त कलाशिक्षक महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बसवेश्वर थोटे,अर्चना माने,विवेकानंद भंडे,प्रमोद हुडगे,धनंजय नाकाडे,विवेकानंद मठपती यांच्यासह सुगाव येथील
सुगाव येथिल तलाठी आलीम शेख ,ग्रामसेवक धीरज आलमले,अहमदपूर तहसीलचे नामदेव अर्जुने,
ईश्वर पाटोळे ,शक्ति अर्जुने ,सोपान मनाळे ,गोविंद वाघमारे ,महेश पुरी ,हरीभाऊ काळे, दिलीप शिंदे ,सुग्रीव काळे,नागनाथ औटी,प्रकाश काळे, विनायक सोनटक्के,प्रकाश सुखसे ,लक्ष्मण गायकवाड ,ज्ञानोबा शेळके , वामन काळे,राघव जाधव,मुस्सा पठाण ,पाशा पठाण ,जालीम पठाण ,बाबू शेख ,अशिष धोतरे ,आदिसह
प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद हुडगे तर आभार धनंजय नाकाडे यांनी मानले.