आम्ही वृद्ध असो किंवा जवान,आम्ही सर्वजन करणार अवश्य मतदान
विधानसभा निवडणूकीसाठी धानोरा येथिल मतदारांनी घेतली शपथ!
अहमदपूर (गोविंद काळे) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी पारंपारिक लोकगीतांच्या माध्यमातून धानोरा तीर्थ गावातील सुजान नव मतदार व वृद्ध मतदार बंधूनी शंभर टक्के मतदान करावे. यासाठी दि.२४ रोजी सकाळी स्वीप कला पथकाद्वारे जाहीर आवाहन करण्यात आले.
‘वृद्ध असो किंवा जवान, सर्वजन करा अवश्य मतदान.’ या घोषणेने
तसेच प्रबोधात्मक लोकगीतातून अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करण्यात आली.
आम्ही जरी वयोवृद्ध असलो तरी संविधानाने आम्हाला दिलेला हक्क आम्ही बजावणार.आम्ही आमच्या गावातून १००% मतदान करुन घेणार अशी गावकरी मंडळींने घेतली शपथ!
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार उज्वला पांगरकर,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,दिलीप हैबतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथक जनजागृती होत आहे.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वीप पथकृ प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने,संभाजी यलपुरवाड,विवेकानंद भंडे,
धानोरा (तिर्थ) येथिल प्रभाकर वाकडे ,बालाजी श्रीमंगले , गोविंदराव कोरनुळे,दत्तात्रय वाकडे ,सलीम शेख ,संभाजी कदम ,रामराव पाटील
आदीसह गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.