बाई मतदान कराया..मतदार तयार झालं..,जनजागृती अभियान कुमठा गावात आलं..!
प्रबोधनात्मक गोंधळ गीतातून मतदार जनजागृती
शिरुर ताजबंद (गोविंद काळे) : लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी अहमदपूर चाकूर विधासभा मतदार संघात स्वीप पथकाद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गोंधळ या प्रबोधनात्मक लोकगीतातून दि.२५ रोजी सायंकाळी कुमठा (बु) या गावात उपस्थितीत शेकडो मतदार बंधू-भगिणींना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी संविधानाने आपणास दिलेला मतदानाचा हक्क येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी कर्तव्य समजून पार पाडावेत.असे स्वीप कलापथकाच्या वतीने आवाहन करण्यात आले.
अहमदपूर विधानसभा निवडणूकीत १००% मतदान होण्यासाठी मतदारांना साकडे घालण्यात आले.
रचनाकार नागनाथ मठपती यांनी शब्दबद्ध केलेली गोंधळ गीत संगीत शिक्षीका सौ.अर्चना माने यांनी सुरेल आवाज गाऊन शेकडो प्रेक्षकांचे दाद मिळविले.
बाई मतदान कराया..मतदार तयार झालं..,जनजागृती अभियान कुमठा गावात आलं..!
साऱ्या गावात काल बोंबाट झाला.., आपण जाणार हाय मतदान कराया…,
अगं लवकर उरकून घे…,
लोक निघायं लागलं…जनजागृती अभियान कुमठा गावात आलं…!जनजागृती अभियान फत्तेपूर गावात आलं…!! गावकरी मतदार बंधूनी ढोलकीच्या ठेका धरुन मनमुराद आनंद लुटला.
या अभियानांसाठी लातूर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार उज्वला पांगरकर,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या आदेशाने मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 'सृजन' स्वीप पथक प्रमुख, महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बसवेश्वर थोटे,नागनाथ स्वामी,सौ अर्चना माने,विवेकानंद भंडे,संभाजी यलपुरवाड,विवेकानंद मठपती आदिनी परिश्रम घेतले.
सेवावृत्त मुख्याध्यापक दशरथ तिगोटे, मोहनराव पाटील अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य एकनाथराव ढोकाडे,बाळू हत्ते,प्रदीप भोसले, संतोष भोसले,चंद्रकांत औटी,अक्षय गुळवे सह नागरिक व माताभगीनी उपस्थित होते.