सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेमध्ये रौप्य पदक कांस्यपदकाची कमाई
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजी नगर दि 23ते 26 ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेसाठी आमच्या शाळेमधून काही विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यामध्ये सेबर सांघिक प्रकारात रोशनी सतीश नरवटे हिने रोप्य पदक मिळविले. व इप्पी सांघिक प्रकारात अस्मिता परमेश्वर पाटील हिने ब्रॉंझ मिळविले. शाळेच्या दृष्टीने अतिशय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याबरोबर संस्था सचिव श्रीमती रेखाताई हाके पाटील यांनी यशस्वीतांचे कौतुक केले तसेच संचालक मा.कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके पाटील तथा मुख्याध्यापक हरिदास सर या सर्वांनी सुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक आकाश अरुण बनसोडे व मोसिन मोबीन अहमद शेख यांनी कठोर परिश्रम घेतले. तथा शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी सुद्धा अभिनंदन केले आहेत.