अहमदपूर चाकुर विधानसभेसाठी मनोज जरांगे यांचे उमेदवार 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरणार

0
अहमदपूर चाकुर विधानसभेसाठी मनोज जरांगे यांचे उमेदवार 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरणार

अहमदपूर चाकुर विधानसभेसाठी मनोज जरांगे यांचे उमेदवार 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरणार

लढायचे की पडायचे ह्यचा सर्वस्वी निर्णय मनोज जरांगे यांचा…

अहमदपूर (गोविंद काळे) : आज झालेल्या बैठकीत सकल मराठा समाज अहमदपूर व चाकुर यांच्या वतीने अहमदपूर – चाकुर विधानसभा निवडणुकीसंदर्भात पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली. दिनांक 29 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात इच्छुक उमेदवार, एकत्रितपणे उमेदवारी अर्ज भरतील. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करतील त्यानुसार जर निवडणूक लढायचे ठरलेच तर ते जो कोणी उमेदवार देतील फक्त त्याचाच अर्ज राहील आणि बाकी उमेदवारांनी आपला अर्ज परत घेतील हे सर्वानुमते ठरले. निवडणूक लढवायचे अथवा पडायचे हा सर्वस्वी निर्णय मनोज जरांगे ह्यांचा असेल आणि तो सर्वासाठी मान्य असेल. उमेदवारांमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्वच उमेदवार मनोज जरांगे ह्यांच्या आदेशाचे पालन करतील असे स्पष्ट करण्यात आले. 29 ऑक्टोबर ला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. बैठकीत सर्व इच्छुक उमेदवार, समन्वयक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *