क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य पालक मेळावा संपन्न

0
क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य पालक मेळावा संपन्न

क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य पालक मेळावा संपन्न

‘पाल्याच्या शिक्षणावर केलेला खर्च म्हणजे मोठी गुंतवणूकच होय’- श्री हरिदास तम्मेवार

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दिनांक 26 ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी 10 वाजता शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात भव्य पालक मेळावा पार पडला. पालक मेळाव्यासाठी प्रमूख मार्गदर्शक सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, शिक्षक श्री हरिदास तम्मेवारहोते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या जेबाबेरला नादार तसेच शाळा समन्वयक श्री संगमेश्वर ढगे, पालक शिक्षक सभेचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पालकांना उद्देशून तम्मेवार म्हणाले की, कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. घरात आपली मुलं अभ्यास करत असताना शांतता ठेवावी. टीव्ही, मोबाईलचा वापर पालकांकडून फक्त कामापुरता व्हावा म्हणजे मुलेही कामापुरताच वापर करतील. मुले ही पालकांचेच अनुकरण करतात त्यामूळे पालकांनी आपल्या पाल्याच्या नजरेत योग्य असावे. पालकांनी शिक्षणावर केलेला खर्च हा खर्च न समजता ती एक मोठी गुंतवणूक समजावी. केवळ फीस भरून मोकळे झाल्याने मुले शिकत नाहीत तर पालकांनी नेहमी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक व गुणात्मक प्रगतीकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. ही पिढी देशाचे उद्याचे भविष्य आहे, म्हणून आपल्या पाल्याकडून तो चांगला माणूस, जबाबदार नागरिक बनेल अशी प्रामाणिक अपेक्षा ठेवावी. विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना ‘विद्यार्थ्यांनो, प्रामाणिकपणे कष्ट करा, अभ्यास करा, यश नक्की मिळते.’ असा मोलाचा सल्लाही दिला. मेळाव्याला मोठ्या संख्येने पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यानंतर पालकांना प्रथम सत्र परीक्षेचा निकाल प्रदर्शित करण्यात आला. उपस्थित विद्यार्थी, पालकांना दिवाळीचा फराळ भेट देऊन शुभेच्छाही देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल अडसूळ, प्रास्ताविक संमेश्वर ढगे तर आभार प्रदर्शन जेबाबेरला नादार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुपरवाजर श्री गोविंद वलसे, गोपाल गवळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *