संत ज्ञानेश्वर विद्यालयात मतदान जनजागृती उपक्रम…
विद्यार्थ्यांनी लिहिली पालकांना व नातेवाईकांना 650 पेक्षा जास्त पत्रे.
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर होत असलेल्या विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदार जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासन स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालक व नातेवाईकांना पत्र लिहून 100 टक्के मतदान करण्याचा एक अनोखा उपक्रम घेण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 650 पेक्षा जास्त पालकांना व जवळच्या नातेवाईकांना जसे मामा ,मामी ,मावशी ,आत्या, आजी ,आजोबा यांना पत्र लिहून आपले अनमोल मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य बजावत असताना सुजाण नागरिक म्हणून निवडणुकीत मतदान करून लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आपले मत मौल्यवान आहे. तसेच लोकशाहीत मतदानाचे महत्त्व या विषयावर निबंध स्पर्धा व भाषण स्पर्धा ही घेण्यात आली. निबंध व भाषण स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. निरीक्षक म्हणून युवराज मोरे व सतीश साबणे यांनी काम पाहिले.
सदरील उपक्रमाचा शुभारंभ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे व मुख्याध्यापिका मीना तोवर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.