अहमदपुरात मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
व्हीव्ही पॅटचे प्रात्यक्षिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अहमदपूर-चाकूर पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघात सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, या मतदारसंघात ३ लाख ४७ हजार ४५४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी ३७६ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदपूर -चाकूर विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण प्रसाद गार्डन येथे घेण्यात आले. तर व्हीव्ही पॅटचे प्रात्यक्षिक महात्मा गांधी महाविद्यालय येथे घेण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी
अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे सहायक निवडणूक अधिकारी अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.पहिल्या सत्रात ५०९ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
तर दुसऱ्या सत्रात १७८९ अधिकारी, आसे एकूण २२९८ मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
दोन सत्रामध्ये मतदाना अधिकाऱ्यांना ४५ मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून व्हीव्ही पॅट मशीनची प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण येथील महात्मा गांधी महाविद्यालय येथे देण्यात आले. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संजय भोसीकर संतोष अनर्थे, एम. ए. मुजावर, संतोष धाराशिवकर, अभिलाष जगताप, एस. आर. जवादे, एन. बी. अर्जुने, प्रल्हाद रिठे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.