गणेश हाके यांना जनसुराज्य शक्ती पक्षाची उमेदवारी
अहमदपूर (गोविंद काळे) : विधानसभा मतदार संघात गणेश हाके यांनी मागील वीस वर्षापासून मतदार संघातील सर्व जनतेची सर्व अडीअडचणी सोडवण्याचे काम केले तसेच मतदारसंघात कोणतेही पद नसताना विविध खात्याअंतर्गत भरपूर असा निधी मंजूर करून आणला. अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष म्हणून निवडून लढवण्याचा विचार असताना गणेश हाके यांनी केलेल्या समाजकार्याची जाण ठेवून जनसुराज शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे यांनी गणेश हाके यांना उमेदवारी जाहीर केली.
29 ऑक्टोबर रोजी गणेश हाके जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सर्वप्रथम गोपीनाथ गड लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या समाधीची दर्शन घेऊन पुढे डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्ती स्थळ येथे दर्शन घेऊन निजवंते नगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेसाठी व उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या रॅलीमध्ये सद्गुरु डॉ.वीरूपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, सद्गुरु पादेश्वर महाराज गिरगावकर वसमत हे उपस्थित राहणार आहेत. तसेच वीर मठ संस्थान अहमदपूर राजशेखर गुरु शिवलींग शिवांचार्य महाराज व भक्तीस्थळ येथील आचार्य गुरुराज स्वामी महाराज विनंती करून आशीर्वाद घेतले.
निजवंत नगर येथून रॅली सुरुवात होईल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन पुढे हिना लॉज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, सावरकर चौक येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेथून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल. तरी सर्व मतदार बांधवानी मतात भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे अहवान गणेश हाके यांनी केले.अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख सतीश केंद्रे यांनी दिली.