धाराशीव आकाशवाणी केंद्रावरुन अहमदपूर स्वीप पथकांने केली मतदार जनजागृती

0
धाराशीव आकाशवाणी केंद्रावरुन अहमदपूर स्वीप पथकांने केली मतदार जनजागृती

धाराशीव आकाशवाणी केंद्रावरुन अहमदपूर स्वीप पथकांने केली मतदार जनजागृती

उपविभागीय कार्यालय अहमदपूर चे नाविन्यपूर्ण उपक्रमातून केली मतदार जनजागृती

लातूर (गोविंद काळे) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती होत आहे,विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी
लातूर-धाराशीव मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढण्यासाठी अहमदपूर सृजन स्वीप कला पथकाने नव मतदार,सुजाण मतदार व दिव्यांग मतदार बंधू-भगिणीसाठी प्रबोधनपर लोकगीतांची रचना करुन प्रबोधपर लोकगीताच्या माध्यमातून राज्पातळीवर मतदार जनजागृती केली.या कार्यक्रमाचे दखल घेऊन कार्यक्रमाचे प्रसारण राज्यातील मतदार श्रोत्यांसाठी आँल इंडिया रेडिओचे धाराशीव आकाशवाणी केंद्रावरुन दि. २८ सोमवार रोजी सायंकाळी ८:१५ वा. या वेळेत तसेच दर सोमवारी निवडणूक होईपर्यंत याच वेळेत प्रसारीत होणार आहे.
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात स्वीप कलापथकाने नाविन्यपूर्ण उपक्रमातून सकाळी ७ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत गावात जाऊन मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन जनजागृती केली. याचबरोबर भारत निवडणूक आयोगाच्या प्राप्त सुचनेनुसार चित्र रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,पथनाट्यातून जनजागृती,निबंध स्पर्धा,मतदार प्रतिज्ञा,संकल्प पत्र,शाळा महाविद्यालय जनजागृती,मतदार जनजागृती रँली,दिव्यांग जनजागृती,प्रबोधनपर भारुड,गोंधळ,पोवाडा,लावणी,जोगवा या लोकगीतातून जनजागृती,प्रवचन,किर्तनातून जनजागृती करण्यात आले.स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे, बसवेश्वर थोटे, मोहन तेलंगे, नागनाथ स्वामी सौ.अर्चना माने, विवेकानंद भंडे, संभाजी यलपुरवाड आदिंनी विशेष परिश्रम घेतले. वरील यशाबद्दल जिल्हाधिकारी तथानिवडणूक निर्णय अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर,पोलिस अधिक्षक सोमय मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर,उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे,तहसीलदार उज्वला पांगरकर,नरसिंग जाधव,
शिक्षणाधिकारी नागेश मापारी, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे आदिनी यशस्वीपणे आकाशवाणीवरुन मतदान जनजागृती केल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *