आर्य वैश्य महिला महासभेच्या वतीने महिला सफाई कामगारांना फराळ व साडी वाटप
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र आर्य वैश्य महिला महासभा यांच्या वतीने दीपावली सणाच्या निमित्ताने एकात्मतेचा व मानवतेचा संदेश देत, शहरातील सफाई कामगारांसाठी फराळांचे वाटप करण्यात आले. यामध्ये 100 महिला सफाई कामगारांना साडी व फराळ वाटप केले. त्यासोबतच उदगीरचे वैभव असलेल्या बालाघाटच्या किल्ल्यावर गेल्या दोन वर्षापासून साफसफाई चे काम करणाऱ्या 50 मजुरांना देखील फराळाचे वाटप करून दीपावलीचा आनंद त्यांच्याही घरामध्ये निर्माण व्हावा, या हेतूने “अशी करूया दिवाळी साजरी” या भावनेने महिलांनी फराळ वाटप केला. या उपक्रमास महाराष्ट्रातील महिला वैश्य महासभेच्या अध्यक्षा सुजाता किशोर पंदिलवार, सचिव राधिका शाम वट्टमवार, कोषाध्यक्ष दीप्ती संतोष मलगे, प्रोजेक्ट मॅनेजर स्मिता मुक्कावार यांच्यासह शुभांगी वट्टमवार, सुरेखा गुजलवार, ज्योती वट्टमवार, मृदुला चिद्रेवार, अर्चना चिकटवार, सविता मोदी, सपना गादेवार, सीमा पारसेवार, सुषमा कोटलवार, विनिता मरेवार, शितल बलशेठवार, डॉ. तृप्ती दाचावार, डॉ. संगीता कोटलवार, अशा चन्नावार, सुहासिनी सुरसेटवार, कमलाक्षी पेन्सलवार, मनीषा बोथीकर, सारिका वट्टमवार, प्रीती पवार, रंजीता मुर्के, स्वाती देबडवार, पल्लवी पोलावार, भाग्यश्री बोथीकर, अंजली कोडगिरे, स्वाती पापंट्टीवार इत्यादींचा सहभाग होता.