स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 7 मोटरसायकल जप्त. 4 आरोपी अटक

0
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 7 मोटरसायकल जप्त. 4 आरोपी अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 7 मोटरसायकल जप्त. 4 आरोपी अटक

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने एकापेक्षा एक गुंतागुंतीचे गुन्हे उघड करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. नुकतेच त्यांनी मोटरसायकल चोरणाऱ्या चौघांना अटक करून सात मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 28/10/2024 रोजी पथकाला माहिती मिळाली की, औसा तालुक्यातील भादा येथे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार त्यांनी चोरलेल्या मोटरसायकली घरासमोर लपउन ठेवल्या आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 28/10/2024 रोजी सदर पथक भादा येथे पोचून एका घरासमोर मोटार सायकलसह थांबलेल्या दोन इसमाना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव शाहरुख प्यारमहम्मद पठाण, (वय 26 वर्ष, राहणार भादा तालुका औसा), शफिक हामजू पिरजादे, (वय 30 वर्ष, राहणार आनंदनगर, भादा तालुका औसा).असे असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या सात मोटार सायकल संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरच्या मोटरसायकली ह्या लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केले आहेत.
नमूद आरोपीकडून चोरीच्या सात मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 1 लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस ठाणे गांधी चौक येथील मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून पोलीस ठाणे शिवाजीनगर व एमआयडीसी येथील प्रत्येकी एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आले असून उर्वरित तीन मोटार सायकल बाबत तपास सुरू आहे.तसेच ताब्यातील नमूद आरोपींताकडे सखोल तपास केला असता त्यांनी आणखीन काही मोटारसायकली चोरी करून भंगार दुकानदार नामे लालडेसाब अब्दुलरजाक मणियारी, (वय 51 वर्ष राहणार नवी पेठ औसा जिल्हा लातूर), सादिक अलीम टेंबीकर, (वय 32 वर्ष, राहणार समुद्रवाणी तालुका धाराशिव (उस्मानाबाद)) यांच्याकडे दिल्याचे सांगितले.
त्यावरून नमूद भंगार दुकानदारांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी नमूद आरोपीताकडून घेतलेल्या मोटारसायकली चे पार्ट वेगळे करून भंगार मध्ये विक्री केल्याचे सांगितले. आरोपी नामे सादिक टेंबीकर याचे कडून चोरलेल्या मोटारसायकलचा चेसी व इंजिनचा काही भाग हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रमाणे नमूद आरोपी त्यांनी एकूण दहा मोटारसायकली चोरल्या असून त्यापैकी सात मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून तीन मोटार सायकल चे पार्ट वेगवेगळे करून इतरत्र विक्री केल्याचे निष्पन्न होत आहे. एकूण एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सात मोटारसायकल व एका मोटरसायकलचे पार्ट जप्त करण्यात आले असून एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नमूद मुद्देमाल व आरोपींना पोलीस ठाणे गांधी चौक येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले आहेत. पोलीस ठाणे गांधी चौक पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, रामहरी भोसले, योगेश गायकवाड,तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, प्रदीप चोपणे यांनी पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *