उदगीर हद्दीमध्ये तिर्रट जुगारावर पोलिसांचा छापा, दोन लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील सताळा मोड ते वायगाव कडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर करीम महबूब शेख रा. डिग्रस ता. उदगीर यांच्या शेतात झाडाखाली जुगाराचा खेळ खेळला व खेळविला जात असल्यास संदर्भात चर्चा सुरू झाली होती. या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकाला माहिती कळाल्यानंतर त्या पथकाने तातडीने सताळा मोड ते वायगाव जाणाऱ्या रोडवर थोड्याच अंतरावर असलेल्या शेतातील एका झाडाखाली तिरट जुगार खेळत व खेळवीत असताना धाड टाकून दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौघाजणाविरुद्ध कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, डिग्रस येथील राहणारा करीम महबूब शेख यांच्या शेतात झाडाखाली आरोपी रामेश्वर भीमराव ढगे, जीवन भानुदास गायकवाड, शहाबुद्दीन महेताब शेख, शाकीर करीम साब शेख हे चौघे गोलाकार स्थितीत बसून विना पास परवाना बेकायदेशीर रित्या पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळीत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा मारला त्यामध्ये जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 3300 तसेच चार मोबाईल आणि तीन दुचाकी असा एकूण दोन लाख वीस हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अवैध व्यापार धंदेविरोधी पथक क्रमांक दोन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवलदार महारुद्र मल्लिकार्जुन स्वामी यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्यावरून या चार आरोपीच्या विरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तिडोळे हे करत आहेत.