सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश, उदगीरात महाविकास आघाडी मध्ये आनंदोत्सव
उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत, काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे निश्चितच भाजपला मोठा धक्का मानला जात असून महाविकास आघाडीला पाठबळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे उदगीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभेत त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाची बाजू भक्कम झाल्याचे सर्वच काँग्रेस प्रेमी बोलत आहेत.