आमदार बाबासाहेब पाटील यांचीआशीर्वाद भेट
अहमदपूर (गोविंद काळे) : आमदार बाबासाहेब पाटील यांनी लातूरमधील देवघर या ठिकाणी माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी राज्यपाल मा. शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि सौ. अर्चनाताई यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत क्रीडामंत्री मा. ना. संजयजी बनसोडे, आमदार अभिमन्यूजी पवार, शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मकरंदभैय्या सावे, शहराध्यक्ष भाजपा देवीदासराव काळे, श्रीकांतजी मजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
काल उंब्रज या ठिकाणी आ. बाबासाहेब पाटील यांनी संत नामदेव महाराज समाधीचे आणि महंत एकनाथ नामदेव महाराज यांचे दर्शन घेतले. निवडणुकीच्या तोंडावर घेतलेले दर्शन ही त्यांची विजयाची खूणगाठ बांधली जात असून यावेळी त्यांच्यासोबत अविनाशजी देशमुख उपस्थित होते.
आ. बाबासाहेब पाटील यांनी धानोरा खु. येथे कोंडीबा महाराज देवस्थान येथे मनोभावे दर्शन घेतले व ह. भ. प. गुरुवर्य उत्तम महाराज धानोरकर व कृष्णा महाराज यांचे दर्शन घेतले.
याचसह अहमदपूर येथे दलित मित्र शिक्षण महर्षी आदर्श नेते डॉ. डी. बी. लोहारे सर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. त्यांच्या या भेटीमुळे दलित बांधवांचा त्यांना या निवडणुकीत पूर्णतः पाठिंबा मिळणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या वेळी त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, ता. अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, श्रीकांतजी मजगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
याचसह चंद्रकांत आप्पा वैजापूरे यांची सदिच्छा भेट घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.