गणेश हाके यांचे शक्ती प्रदर्शन करत जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सतत चर्चेमध्ये असणारे, जनसामान्याचे नेतृत्व, मतदार बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम ज्यांनी केले असे गणेश हाके यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत हजारो मतदार बांधवांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी बोलताना प्रस्थापित लोकांनी जनतेची दिशाभूल करून फक्त मतापुरता वापर करून घेतला महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत कधी जात पाहून मतदान केले जात नव्हते. याची प्रथा प्रस्थापित लोकांनी गेल्या लोकसभा निवडणुकी पासून सुरू केली असे मत गणेश हाके यांनी व्यासपीठावरून बोलताना केले. मी किंवा माझ्या व्यासपीठावर कोणताही मंत्री, आमदार, खासदार, काय साधा नगरसेवक नसताना किंवा कोणताही बलाढ्य पक्ष माझ्यासोबत नाही तरी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित जनताच माझा पक्ष व उपस्थित स्टेजवरील कार्यकर्तेच माझे नेते यामुळे मला कोणतेही भय नाही माझा विजय हा जनतेचा विजय आहे त्यामुळे ही जनता या वेळेस प्रस्थापितांना गाडून जनसुराज्य शक्ती पक्षाला विजयी केल्याशिवाय शांत बसणार नाही. असे मत गणेश हाके यांनी निजवंते नगर येथे आयोजित सभेमध्ये मांडले.
व्यासपीठावर उपस्थिती मान्यवर यांनी आपली मते व्यक्त करताना गणेश हाके हे बहुजणांचे नेते आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करू करू पण अहमदपूर चाकूर विधानसभेवर बहुजनांचा झेंडा लावू असे सांगितले.
निजवंते नगर येथून रॅली सुरुवात या रॅलीमध्ये 18 पगड जातीचे पारंपारिक वेशभूषा धारण करून लमानी, गारुडी, पांगुळ, वारू, पोतराज, मसनजोगी, वासुदेव अशा वेशभूषेत सर्व बांधव उपस्थित होऊन छत्रपती शिवाजी चौक- आझाद चौक -हनुमान मंदिर -हिना लॉज- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- सावरकर चौक अशी रॅली काढून व महामानवांना अभिवादन करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.
उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी बाबत गणेश हाके यांनी ऋण व्यक्त केले.