आयुर्वेद चिकित्सा पद्धतीची निरोगी जीवन व रोगनिवारणामध्ये अनन्यसाधारण उपयोगिता :- डॉ.पांडुरंग दोडके
उदगीर (प्रतिनिधी) : बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे धन्वंतरी जयंतीचे औचित्य साधून आयुर्वेदा फॉर ग्लोबल हेल्थ या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या नववा आयुर्वेद दिन-सप्ताह निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना सामान्य रुग्णालय,उदगीरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांडुरंग दोडके यांनी उपरोक्त उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील हे होते तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सामान्य रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार, डॉ.सायाराम श्रीगिरे,डॉ.अलका भंडारे,डॉ.मंगेश मुंढे,डॉ.अविनाश जाधव,डॉ.मल्लिकार्जुन बिरादार, डॉ.उषा काळे हे उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकीय व्यवसायिकांचे आराध्य दैवत भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमा पूजन-स्तवन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
पुढे बोलताना डॉ.पांडुरंग दोडके म्हणाले की जागतिकीकरण व स्पर्धात्मक युग तथा नागरिकांच्या आहार-विहार-जीवनशैलीमधील प्रकृतीला अनुरूप नसलेले बदल आणि तसेच फास्ट फूड,जंक फूड याचे अति प्रमाणात सेवन व मानसिक ताणतणाव यामुळे रोग प्रतिकारक्षमता कमी होऊन आजाराचे वाढलेले प्रमाण अशा परिस्थितीमध्ये निरोगी जीवनासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या दिनचर्या-ऋतुचर्याचे पालन करणे तथा योग-प्राणायाम याचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील म्हणाले की हृदयरोग,मधुमेह व कर्करोग यासारख्या विविध जीवनशैलीजन्य आजारासोबतच अन्य रोग बरे करण्यासाठी उदगीर व परिसरामध्ये नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन,आयुष मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली तथा आयुष संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई आणि तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक यांच्या निर्देशानुसार धन्वंतरी जयंती वर्ष-२०२४ करिता घोषित केलेल्या आयुर्वेद नवाचार और उद्यमिता; स्कूल मे स्वास्थ्य के लिए आयुर्वेद; आयुर्वेद और खाद्य नवाचार; समग्र स्वास्थ्य के लिए आयुर्वेद; आयुर्वेद और महिला स्वास्थ्य आणि तसेच आयुर्वेद एवम् कार्यस्थल स्वास्थ्य” या विविध संकल्पनेनुसार वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन पुढील वर्षभर करण्याचा मानस व्यक्त केला.
याप्रसंगी डॉ.दत्तात्रय पवार यांचे समायोचित भाषण झाले.सूत्रसंचालन डॉ.मीरा कदम यांनी,प्रास्ताविक डॉ.मयुरी ठाकूर यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.किरण मुलगिर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दीपिका भद्रे,डॉ.प्रवीण बलुतकर,डॉ.शिवकांता चेटलुरे,डॉ.अमोल पाटील,डॉ.दीपक खोडवे,डॉ.विशाल झंपले,डॉ.मनीषा कांबळे, डॉ.पुजा वाकडे यांचे सहकार्य लाभले.