संकल्प पत्राद्वारे मतदान जनजागृती
उदगीर (प्रतिनिधी) : भारत निवडणुक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता स्विप अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मतदान जनजागृती करणेबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने २३७ उदगीर मतदार संघात शालेय स्तरावर विदयार्थ्यां मार्फत संकल्प पत्राद्वारे मतदान जनजागृती करणेबाबत उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचे आवाहन केले . संकल्प पत्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . उदगीर व जळकोट तालुक्यातील 121 शाळामधे विदयार्थ्यांना संकल्प पत्र देण्यात आले.उदगीर मतदारसंघातील सुमारे १०३००० पालकांना मतदान करणेकरीता जनजागृती विदयार्थ्यां मार्फत करण्यात आली. विदयार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला व आपल्या पालकांना आगामी निवडणुकीमधे मतदान करण्यास संदेश दिल्याबाबतची माहिती तहसीलदार उदगीर तथा सहा निवडणुक निर्णय अधिकारी राम बोरगावकर व तहसीलदार जळकोट तथा सहा निवडणुक निर्णय अधिकारी राजेश लांडगे यांनी कळविले.