आमदार बाबासाहेब पाटील यांना वाढता पाठिंबा
हडोळती (गोविंद काळे) : गावात अनेक युवकांनी आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांचे सहर्ष स्वागत केले.
याप्रसंगी वैभव कांबळे, तुषार कांबळे, वैभव गायकवाड, धीरज कांबळे, विशाल कांबळे, योगेश कांबळे, आशिष कांबळे, रितेश कांबळे यांनी पक्षात प्रवेश केला.
यावेळी आ. बाबासाहेब पाटील यांच्यासोबत शरद पवार, माजी सरपंच गंगाधरराव ताडमे, अनिल यादव पाटील, सरपंच प्रतिनिधी पिंटू भोगे, आदिनाथ पाटील, शादुलभाई शेख, माजी सरपंच माधवराव गोजेवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
याचसह अहमदपूर या ठिकाणी श्रीकांतजी बनसोडे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
आज आ. बाबासाहेब पाटील यांच्या इंद्रायणी निवासस्थानी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केला.
याच्यासह अहमदपूर व्यापारी भेटीगाठी झाल्या, यावेळी प्रशांत घाटोळ, द्वारकादास शामकुमार वस्त्रदालन, अभिलाष पोकर्णा, शरण चवंडा, प्रा. इरफळे, पिंटू राठोड मिल, गोपिकीशन भराडिया, मतीन कुरेशी नॅशनल ट्रेडर्स आदी ठिकाणी सदिच्छा भेट दिली.
आज आ. बाबासाहेब पाटील यांनी श्रीकांत बनसोडे यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, रिपाई जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, ता. अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निखिल कासनाळे, सुजित रेड्डी, अय्याज भाई शेख, अशोक सोनकांबळे, आशिष तोगरे, अभय मिरकले आदी उपस्थित होते.
आ. बाबासाहेब पाटील यांनी यावेळी चिलखा, सोरा, पार, येस्तार, बोरगाव, मावलगाव, वैरागड, लेंडेगाव, ढाळेगाव आदी गावात भेटीगाठी देत नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.