साकेत मालवीय निवडणूक निरीक्षक जनरल यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा

0
साकेत मालवीय निवडणूक निरीक्षक जनरल यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा

साकेत मालवीय निवडणूक निरीक्षक जनरल यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा

अहमदपूर (गोविंद काळे) : साकेत मालवीय निवडणूक निरीक्षक जनरल यांनी २३६ अहमदपूर विधानमा मतदार संघास दि २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता भेट दिली या भेटी दरम्यान सर्व कक्षाच्या अधिकारी / कर्मचारी यांची आढवा बैठक घेवून निवडणूक विषयक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीमध्ये निवडणूक विषयक मनुष्यबळ व्यवस्थापन, आदर्श आचार संहितेचे पालन, उमेदवाराचे नामनिर्देशना बाबत, कर्मचारी प्रशिक्षणाबाचत, मतदार जनजागृ‌ती कक्ष, पोस्टल मलपत्रीका वाहन कक्ष. परवाना कक्ष (एक खिड़की) निवडणूक साहित्य, मतदार यादी कार्यप्रती तयार करणे, मतदान दिवशी करावयाचे कामकाज, व मतमोजनी दिवशी करावयाचे कामकाज इत्यादी बाबतचा बाबनिहाय आढावा घेतला. तसेच विविध कक्षांना भेटी देऊन पाहाणी केली. सर्व बाबतीत आवश्यक त्या सुचना केल्या.

या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे २३६ अहमदपूर विधानसभा मतदार संघ यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देवून स्वागत केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर, नरसिंग बळवंत जाधव तसेच अमोलकुमार अंदेलवाड गट विकास अधिकारी अहमदपूर हे उपस्थीत होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *