माजी नगरसेविका विजयाताई हामणे यांचे दुःखद निधन
अहमदपूर (प्रतिनिधि) : माजी नगरसेविका तथा रुद्र महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा विजयाताई केदारनाथप्पा हामणे यांचे अल्पशा आजाराने दि. 30 रोज बुधवारी रात्री दहा वाजता वाजता वयाच्या 70 व्या वर्षी राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर दि. 31.10.2024 रोज गुरुवारी सकाळी 11 वाजता मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये लिंगायत स्मशानभूमी मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुलगी, सून, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून उद्योजक अमोल हामणे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.