कार आणि आयशर टेम्पोच्या अपघातात चार महिला ठार, तीन जखमी

0
कार आणि आयशर टेम्पोच्या अपघातात चार महिला ठार, तीन जखमी

कार आणि आयशर टेम्पोच्या अपघातात चार महिला ठार, तीन जखमी

उदगीर (प्रतिनिधी) : शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर इस्लामपूर आणि एकुरका रोडच्या मध्ये कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात होऊन, चार महिला ठार तर तिघे जखमी आहेत. यासंदर्भात हाती आलेली माहिती अशी की, सात नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एकुर्गा येथून उदगीर कडे जात असलेली कार (क्रमांक एम एच 02 बी एम 4482) वेगाने येत असताना समोरून उदगीर येथून अहमदपूरकडे जात असलेल्या आयशर टेम्पो (क्रमांक एम एच 24 ए यु 47 56) या दोघांची धडक होऊन कार मधील चार महिला ज्यामध्ये मंगलबई गोविंद जाधव (वय 55 वर्ष रा. एकुरका) प्रतिभा संजय भंडे (वय तीस वर्ष रा. दावणगाव) प्रणिता पांडुरंग बिरादार (वय 25 वर्ष रा. होनाळी तालुका देवणी) अनन्या रंजीत भंडे (वय बारा वर्षे रा. दावणगाव तालुका उदगीर) या चौघींचा मृत्यू झाला आहे. इतर तीन जखमी वर उदगीर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या दुर्घटनेची माहिती समजताच वाढवणा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भीमराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल एस के रंगवाळ, सोनवणे, बोईनवाड, संजय दळवी पाटील, वाडकर, उजडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले. भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *