उदगीर- जळकोटच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या – सुधाकर भालेराव

0
उदगीर- जळकोटच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या - सुधाकर भालेराव

उदगीर- जळकोटच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या - सुधाकर भालेराव

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर संग्राम भालेराव यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली असून शहरासह ग्रामीण भागामध्ये कॉर्नर बैठका, संवाद दौऱ्यांमधून मतदारसंघ पिंजून काढला आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करताना केलेल्या शाश्वत विकासाच्या आधारावर राज्यातील महायुती सरकारला सत्तेवरून पायउतार करून महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. उदगीर तालुक्यातील लोहारा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा माजी आ. सुधाकर भालेराव यांनी 2009 ते 2019 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उदगीर , जळकोट तालुक्यातील जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग, नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणातून तब्बल 60 किलोमीटर अंतरावरून उदगीर शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा केला, नगरोत्थान विकास योजनेतून उदगीर शहरातील दर्जेदार रस्त्यांसाठी 77 कोटी रुपये मंजूर करून दिले, मौजे डोंगर कोणाळी साठवण तलावासाठी 21 कोटी रुपये, चोंडी साठवण तलवासाठी 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील रेल्वे गेट च्या ठिकाणी सतत होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन तब्बल 15 कोटी रुपयांच्या उडान पुलाची उभारणी केली आहे. तसेच बिदर रोडवरील उडान पुलासाठी 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. परंतु मागील पाच वर्षात उदगीर विधानसभेच्या शाश्वत विकासाचा गाडा थांबला असून तो पुन्हा गतिमान करण्यासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद देण्याचे आवाहन सुधाकर भालेराव यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *