दोन कोंबिंग ऑपरेशन व दोन मासरेड राबवून 1 कोटी 57 लाख 90 हजार रुपयाचा मद्यसाठा, 31 वाहने जप्त

0
दोन कोंबिंग ऑपरेशन व दोन मासरेड राबवून 1 कोटी 57 लाख 90 हजार रुपयाचा मद्यसाठा, 31 वाहने जप्त

दोन कोंबिंग ऑपरेशन व दोन मासरेड राबवून 1 कोटी 57 लाख 90 हजार रुपयाचा मद्यसाठा, 31 वाहने जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर पोलिसांनी धडाकेबाज म्हणून राबवत दोन कोंबिंग ऑपरेशन व दोन मोठ्या रेड टाकून एक करोड 57 लाख 90 हजार रुपयांचा मध्ये साठा जप्त केला आहे. तसेच 31 वाहने जप्त केली आहेत. या सदर्भात थोडक्यात माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हाभरातील अवैध धंद्यांविरोधात लातूर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हाभरातील अवैध धंद्यांविरोधात लातूर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. 15/10/2024 ते 04/11/2024 कालावधीमध्ये लातूर पोलिसांनी दोन कोंबिंग ऑपरेशन व दोन मासरेड चे आयोजन करून अवैध देशी-विदेशी मद्य व गावठी हातभट्टीची दारू व गुन्ह्यात वापरलेले 31 मोठे वाहन असा एकूण 1 कोटी 57 लाख 90 हजार 572 रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टी रसायन नष्ट केला आहे. याप्रकरणी 179 व्यक्ती विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत 176 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असून, लातूर पोलिस अधीक्षक मा. सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
लातूर पोलिसांनी दोन कोंबिंग ऑपरेशन व दोन मासरेड चे आयोजन करून जिल्ह्यातील गावठी दारू बनविणारे अड्डे हुडकून नष्ट केले. डोंगर, दऱ्या, नदी-नाल्यांच्या दुर्गम भागात पोलिसांनी पायपीट करीत अड्डे उद्ध्वस्त केले. लातूर पोलिसांनी जिल्हाभर कारवाई करीत अवैध धंदे करणारे 179 व्यक्तीविरोधात 176 गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमध्ये 20,470 लिटर देशी-विदेशी मद्य, तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा मुद्देमाल जप्त करीत नष्ट केला. ही कारवाई जिल्हाभर सुरू असून, येत्या काही दिवसांत ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मा.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी लातूर पोलिसांना दिले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *