मंत्री नाही तर आपला भाऊ म्हणून गेली पाच वर्ष निष्ठेने काम केले
उदगीर (प्रतिनिधी) : मागील पाच वर्षात उदगीर मतदार संघाचा भौतिक विकास करण्याबरोबरच बौद्धिक मेजवानी देण्यासाठी उदगीर मध्ये प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, मराठी बाणा यासह विविध उपक्रम घेऊन उदगीर शहराची ओळख जगाच्या नकाशावर करण्याचे काम केले असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर, हकनकवाडी, वंजारवाडी, गंडीपाटी या भागातील नागरिकांशी गाव भेट दौऱ्यानिमित्त संवाद साधताना बोलत होते.जी. प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, प्रा.श्याम डावळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संजय बनसोडे यांनी, गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात उदगीरचा सर्वांगीण विकास केला असुन या या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटवला असून नांदेड जिल्ह्यातील बारूळ धरणातून मतदार संघात पाणी आणण्यासाठी वॉटर ग्रीड सारखी सर्वात मोठी योजना मंजूर करून मतदार संघाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवला, बॅरेजेस व कोल्हापुरी बंधारे उभारून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती केली. हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन या भागातला शेतकरी समाधानी होईल, यासाठी प्रयत्न केले. महायुतीचे सरकार हे सर्वसमान्यांचे सरकार असुन लाडक्या बहिणीसाठी योजना आणली आणि ती पूर्ण केली. मतदार संघात सौर ऊर्जेचे प्रकल्प आणले असुन भविष्यात दिवसा शेतकरी बांधवांना वीज पुरवठा करण्याचा आपला मानस आहे. मी मंत्री असताना देखील केवळ आपला भाऊ म्हणूनच मी प्रामाणिकपणे गेली पाच वर्ष आपली सेवा केली असल्याचे संजय बनसोडे यांनी सांगितले.