श्री पांडूरंग विद्यालयाच्या साहेब टाळकुटेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
उदगीर (प्रतिनिधी) : नांदेड येथे नुकत्याच झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर मध्ये शिकणारा विद्यार्थी टाळकुटे साहेब विजयकुमार याची 800 मीटर धावणे या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्री पांडुरंग विद्यालयाचाच विद्यार्थी सोमासे सुमित मारोती हा 1500 मीटर धावणे जिल्हास्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला आहे. क्रीडा शिक्षक केंद्रे एम.एस.आणि दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष गोविंद केंद्रे , संस्थेचे सचिव विनायकरावजी बेंबडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही., तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.