वडवळ नागनाथ सर्कलमध्ये गणेश हाके ची जोरदार मुसंडी
अहमदपूर (गोविंद काळे) : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने प्रचार दौरे सुरू असताना वडवळ नागनाथ सर्कलमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश हाके हे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेले असता मतदारांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावागावात शेकडो मतदार हाकेच्या भेटीसाठी वाट पाहत आहेत. दिवस असो वा रात्र कायकर्त्यांची रांग हाकेच्या सोबत पाहाव्यास मिळत आहे. वडवळ नागनाथ सर्कलमध्ये ज्या गावात जाईल त्या गावांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांच्या नावाचा बोलबाला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गावा गावामध्ये एकच चर्चा पहावयास मिळत आहे प्रस्थापित लोकांनी कोणत्याच गावचा विकास केलेला नाही. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून निवडणुका जिंकल्या यापुढे असे होणार नाही. आम्ही सर्व गावकरी मंडळी ठरवले आहे यावेळेस जनसुराज्य शक्ती पक्षाचे गणेश हाके यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी जीवाचं रान करून गणेश हाके यांना विजयी करणार यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.