यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थींनींचे राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत सहभाग
अहमदपूर (गोविंद काळे) : समक्ष शिक्षा अंतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली व महाराष्ट्र शिक्षण परिषद,मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा २०२४-२५ नुकतेच पुणे येथे पार पडले.यात यशवंत विद्यालय अहमदपूर येथिल विद्यार्थिंनी कु.साक्षी कोंडीबा गंगाथडे हीने राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत आपला उत्कृष्ठ पणे कथा कथन करुन आपला सहभाग नोंदविला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे मा. संचालक राहुल रेखावार साहेब यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने दि.१३ नोव्हेंबर रोजी सकाळी महात्मा फुले सभागृहात कला उत्सव स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडले. यावेळी परिषदेचे सहसंचालक मा.अनुराधा ओक, सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागाच्या उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, उपसंचालक ज्योती शिंदे यांच्यासह परिषदेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन चव्हाण उपविभाग प्रमुख ,कला व क्रीडा विभाग ,यांनी केले. स्पर्धेचे स्वरूप नियम व अटी यांची माहिती उपसंचालक डॉ .सावरकर यांनी दिली. अधिव्याख्याता संघप्रिया वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय सहाय्यक बाळासाहेब गायकवाड यांनी केले. संगीत शिक्षिका पद्मजा लांमरुड यांनी संपूर्ण कला उत्सव स्पर्धेचे संयोजन केले. विषय सहाय्यक अण्णासाहेब कुटे, श्रीम. विनया भोसले ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी संयोजनासाठी सहाय्य केले.
वरील सहभागाबद्दल डायटचे प्राचार्य डॉ.भगिरथी गिरी,माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी,प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, अहमदपूरचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक सांगवीकर,सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी,सह सचिव डॉ. सुनिता चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उपमुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे,शिवाजी सूर्यवंशी सांस्कृतिक प्रमुख राजकुमार पाटील,शरद करकनाळे,कलाध्यापक महादेव खळुरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.