मतदानाची टक्केवारी वाढवून अहमदपूर पॅटर्न निर्माण करावा – राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक महादेव खळुरे
अहमदपूर (गोविंद काळे) : सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसून येत नाही.संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क सर्वांनी कर्तव्य म्हणून बजावले पाहिजे.हा आपला अधिकार आहे.आपण जरी बाहेरगावी रहात आसाल तरी निवडणूक काळात आपण मतदान करावेत अशी विनंती स्वीप पथकाने तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध मिडियाद्वारे महादेव खळुरे यांनी जनजागृती केली.
अहमदपूर तालुका हा शैक्षणिक क्षेत्रात अहमदपूर पॅटर्न म्हणून आपला दबदबा कायम ठेवून आहे. त्याचप्रमाणे अहमदपूर तालुक्यातील सुजाण नवतरुण मतदार बांधव मोठ्या संख्येने मेट्रो सिटी मध्ये नोकरीसाठी, व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत.या सर्व तालुक्यातील मतदार बंधू भगिनींनी येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी आपण आपल्या तालुक्यात येऊन मतदानाचा हक्क बजजावा.
अहमदपूर तालुक्याचे नाव मतदानाच्या टक्केवारीत सुद्धा एक वेगळे पॅटर्न निर्माण करून दाखवावे. राज्यामध्ये आपल्या तालुक्यातील मतदानाची टक्केवारी जास्तीची असावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे खळुरे यांनी आव्हान करण्यात केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी अहमदपूर तालुक्यात प्रबोधपर लोकगीतातून मतदार जनजागृती होत आहे.आपल्या गावातून १००% मतदान करण्यासाठी स्वीप पथकाने आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमदपूर तहसील प्रशासनाच्या आदेशाने स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बस्वेश्वर थोटे,नागनाथ स्वामी,अर्चना माने,विवेकानंद भंडे,संभाजी यलपुरवाड,प्रमोद हुडगे,धनंजय नाकाडे,विवेकानंद मठपती,जयप्रकाश हाराळे,कपिल बिरादार प्रा,शिवशंकर पाटील आदिनी परिश्रम घेत आहेत.