भाजपाच्या १६ पदाधिकाऱ्यांची पक्षातुन हकालपट्टी

0
भाजपाच्या १६ पदाधिकाऱ्यांची पक्षातुन हकालपट्टी

भाजपाच्या १६ पदाधिकाऱ्यांची पक्षातुन हकालपट्टी

अहमद्पुर (गोविंद काळे) : अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या पक्षशिस्त व अनुशासनभंग करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत हकालपट्टी करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले अहमदपूर विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या घटकातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील यांची माहायुतीची अधिकृत उमेदवारी आहे. महायुतीचे ठरल्याप्रमाणे विधानसभा मतदारसंघात दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणे अपेक्षित असताना काही कार्यकर्त्यांनी पक्ष शिस्त व अनुशासन भंग केल्याचे पक्षश्रेष्ठींना निदर्शनास आल्याने विधानसभा मतदारसंघातील खालील पदाधिकाऱ्यांना निष्काशीत करण्यात आले आहे. प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी रेखा तरडे, सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, बालासाहेब होळकर, हेमंत गुट्टे, धनराज गुट्टे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी हनुमंत देवकते, महेश बिलापट्टे, ज्ञानोबा बडगिरे, बालाजी गुट्टे तर तालुका कार्यकारणी पदाधिकारी माणिक नरवटे, परमेश्वर आढाव, संतोष कोटलवार, मन्नान शेख, दत्ता खंदाडे, बालाजी भगत व रमेश कांबळे यांचा समावेश आहे.
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख म्हणाले अहमदपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन काम करावे.
यावेळी भाजपाचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक गोपाळ बिस्ट, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भारत चामे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, राजकुमार मजगे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, चाकूर तालुका अध्यक्ष वसंत डिगोळे, गोविंद गिरी, निखिल कासनाळे, अमित रेड्डी, सुशांत गुणाले यांची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *