शिवाजी महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी) : शिवाजी महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयंती समिती कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे हे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात नेहरुंच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. समाजवादी विचार जनमानसात रुजविण्यासाठी आपली उभी हयात घालवली. याप्रसंगी डॉ.एस.एम.कोनाळे,
अधीक्षक व्ही.डी.गुरनाळे, मुख्य लिपिक आर.एम. लाडके, कमलाकर जगताप, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख प्रोफेसर डॉ.सुरेश शिंदे यांनी तर आभार डॉ.व्ही.के भालेराव यांनी मानले.