श्यामलाल हायस्कूलच्या खेळाडूंची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल हायस्कूल मधील 17 वर्ष वयोगटाखालील विद्यार्थी पार्थ संदीप क्षीरसागर आणि प्रणव कृष्णकांत बेद्रे या दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या विभागीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या खेळाडूंनी तालुका पातळी व जिल्हा पातळीवर अतिशय उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन करून क्रीडा कौशल्य दाखवले त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने व क्रीडा प्रशिक्षकांनी पार्थ क्षीरसागर व प्रणव बेद्रे या दोन विद्यार्थ्यांची नांदेड येथे होणाऱ्या विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड केलेली आहे. त्याबद्दल या दोन्ही खेळाडूंचे श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था पदाधिकारी संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य, उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर, सचिव ऍड. विक्रमजी संकाये सहसचिव अंजुमणी आर्य तसेच श्यामलाल हायस्कूल चे मुख्याध्यापक भारत खंदारे, पर्यवेक्षक राहूल लिमये, सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी या खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शक दिनेश बोळेगावे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.