महात्मा फुले महाविद्यालयात गुरुनानक व बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

0
महात्मा फुले महाविद्यालयात गुरुनानक व बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात गुरुनानक व बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे ) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक व थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या गुरुनानक व बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुरुनानक व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार वामणराव मलकापूरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *