मतदार बंधुनी निवडणूकीच्या उत्सवात १००% सहभाग नोंदवावे
(विधानसभा निवडणूकीसाठी चापोली येथिल मतदारांना स्वीप पथकाने केले आवाहान ! )
चापोली (गोविंद काळे) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी पारंपारिक लोकगीतांच्या माध्यमातून चापोली गावातील सुजान नव मतदार व वृद्ध मतदार बंधूनी शंभर टक्के मतदान करावे. यासाठी दि.१४ रोजी सायंकाळी चापोली येथे स्वीप कला पथकाद्वारे जाहीर आवाहान करण्यात आले.
प्रबोधात्मक लोकगीतातून अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करण्यात आली.
आम्ही जरी वयोवृद्ध असलो तरी संविधानाने आम्हाला दिलेला हक्क आम्ही बजावणार.आम्ही आमच्या गावातून १००% मतदान करुन घेणार अशी गावकरी मंडळींने घेतली शपथ!
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार उज्वला पांगरकर,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,दिलीप हैबतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथक जनजागृती होत आहे.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वीप पथकृ प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,प्रमोद हुडगे,बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने,संभाजी यलपुरवाड,विवेकानंद भंडे,कपिल बिरादार,विवेकानंद मठपती,प्रा.शिवशंकर पाटील,जयप्रकाश हराळे
चापोली येथिल संतोष कुरुळेकर ग्रामसेवक,
प्रभाकर होनराव ,रामराव समांदे ,विश्वनाथ शिंदे ,माधव आंबदे ,जाफर शेख ,किशोर भालेराव ,रमेश सरकाळे , बाबाराव जाधव,तुकाराम गायकवाड आदीसह गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.