लोकशाही मधून राजा निर्माण व्हावा – विनय कोरे
अहमदपूर (गोविंद काळे) : लोकशाही मध्ये राजा हा मतपेठीतूनतयार व्हावा, नाहीतर राजा च्या पोटी राजा, शेतकऱ्यांच्या पोटी शेतकरी असे झाले तर आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा अधिकाराचा आपल्याला काय उपयोग त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित असलेले एवढेच नाही तर मंत्रालयीन कामाचा धनदांडगा अनुभव असणारे गणेश हाके मोठ्या मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवावे असे अहवान
विधानसभा निवडणूक 2024 च्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांच्या प्रचारानिमित्त थोडगा रोड येथे आयोजित सभेमध्ये जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी केले.
यावेळी ओ बी सी नेते लक्ष्मण हाके यांनी बोलताना सांगितले गावगाड्यातील अठरापड जातींचे मत यांना चालते पण याच जाती उमेदवार किंवा आमदार चालत नाही असे मत लक्ष्मण हाके यांनी मांडले.
यावेळी उमेदवार गणेश हाके बोलताना 18 पगड जातीला सोबत घेऊन सर्वांना न्याय भावना देण्याचे काम मी करणार आहे. मला तुम्ही मायबाप जनतेने आमदार केल्यास मनामध्ये कोणतीही मजबूत नाही बाळगता सर्व समावेशक मतदारसंघाचे विकासासाठी काम करील असे सांगितले.
यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी मनोगत व्यक्त करताना गणेश हाके यांचा विजय पक्का आहे मतदारसंघातील लोकांनी ठाम निश्चय केलेला आहे त्यामुळे आपलं मत गणेश हाके च्या पारड्यात देऊन आमदार बनवावं असे म्हणाले.
यावेळी मतदारसंघातील नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.