आ. बाबासाहेब पाटील यांचा सुसंवाद दौरा उत्साहात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : आ. बाबासाहेब पाटील यांचा शेनकूड, टाकळगाव, सुनेगाव (शेंद्री), सुमठाणा, वंजारवाडी, धसवाडी आणि खंडाळी आदी गावांमध्ये सुसंवाद दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नागरिकांच्या अलोट गर्दीतून विजयाचा गुलाल आ. पाटील यांच्याच वाट्याला येणार, याचे संकेत मिळत असून ही त्यांनी आजवर केलेल्या कामाची फलश्रुती आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, माजी जि. प. सदस्य अशोकराव केंद्रे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव खांडेकर, विशंभरराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुजिब पटेल जहागीरदार, तानाजी राजे, माधव नागमोडे, डॉ. फुजल जहागीरदार, रामभाऊ नरवटे, सूर्यकांत चिघळे, ॲड. मुजमिल हाश्मी, अय्याज भाई शेख, बाबू भाई रुईकर, गैबीसाब हाळणीकर, भैया भाई सय्यद, हसनभाई पैलवान, इलियास भाई सय्यद, जमीर सौदागर, श्याम भगत, विकास बोबडे, बापू कज्जेवाड, चंद्रकांत गंगथडे, अजिज काझी, हुसेन शेख, एजाज मुंजेवार, एम. डी. इरफान, युवराज बदने, अनंत होळकर आदी उपस्थित होते.