चापोलीच्या विकासासाठी कटिबद्ध : आ. बाबासाहेब पाटील

0
चापोलीच्या विकासासाठी कटिबद्ध : आ. बाबासाहेब पाटील

चापोलीच्या विकासासाठी कटिबद्ध : आ. बाबासाहेब पाटील

चापोली (गोविंद काळे) : येथे राष्ट्रीय महामार्गाचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला,बोगद्याचा विषय सोडवण्याचा प्रयत्न केला. चापोलीच्या विकास कामासाठी भररिव निधी देऊन चापोलीचा विकास करण्याचा प्रयत्न केला व भविष्यात सुद्धा चापोलीच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी चापोली येथे केले.
ते चापोली येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन मद्रेवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने, भाजप प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे, दयानंदराव सुरवसे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, वसंत डीगोळे,खंडेराव वाघ,मुजीब पटेल, महायुतीचे अनेक पदाधिकारी
उपस्थित होते.
मतदार संघाच्या भवितव्यासाठी बाबासाहेब पाटलांना निवडून द्या : दिलीपराव देशमुख
अहमदपूर चाकूर मतदार संघाच्या भवितव्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांना पुन्हा आपल्याला विधानसभेत पाठवायचं असून सर्वसामान्य महिलेला हनुमान देण्याचं काम आपल्या भाजप महायुती सरकारने केली आहे यामुळे पुन्हा एकदा आपण महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना चापोलीतून प्रचंड मताधिक्य दूध विजयी करावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केले.
सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या नेत्याला विधानसभेत पाठवा : गोपाल माने
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेसाठी सतत झटणाऱ्या आमदार बाबासाहेब पाटील यांना पुन्हा विधानसभेत पाठवा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांनी केले.
विनायकरावच्या भूलथापाला मुस्लिमांनी बळी पडू नये : मुजीब पटेल
जे विनायकराव भाजप मध्ये असताना यएन आर सी लागू करण्यासाठी आंदोलन करत होते अशा विनायकराव पाटलाच्या भुलतापाला मुस्लिम मतदार बंधू-भगिनींनी बळी पडू नये व सर्व मुस्लिम बांधवांनी बाबासाहेब पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन अहमदपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मुजीब पटेल यांनी चापोलीच्या जाहीर सभेत केले.
यावेळी मिलिंद महालिंगे, दयानंद सुरवसे, टी एन कांबळे, सुनील सूर्यवंशी आदींची समायोजित मनोगते झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *