ना. संजय बनसोडे यांना मत म्हणजे विकासाला मत – दीपाली औटे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना मत म्हणजे विकासाला मत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा दीपाली औटे यांनी केले.
ना. बनसोडे यांच्या प्रचारार्थ शहरातील विविध प्रभागात व ग्रामीण भागात महिलांच्या कॉर्नर बैठकीत महिलांशी त्या संवाद साधत आहेत. यावेळी बोलताना दीपाली औटे यांनी सांगितले की, ना. संजय बनसोडे यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात उदगीर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास साधला असून उर्वरित विकासकामांसाठी पुन्हा त्यांना निवडून द्यावे. अशी विनंती करीत महायुतीचे उमेदवार बनसोडे यांनी
पाच वर्षांत उदगीर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला. जिल्ह्याचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक
असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणले, मतदारसंघातील बहुतांश गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली, विविध शासकीय इमारती
उभारल्या, तिरू नदीवरचे बॅरजेस उभारले, मतदारसंघात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मार्गाचे रस्त्यांचे जाळे उभारले, पाच वर्षांत सर्वच जाती-धर्माला समान न्याय देत विकास करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. या कॉर्नर बैठकीसाठी ना. बनसोडे यांच्या अर्धांगिनी शिल्पा बनसोडे सह श्रद्धा बनसोडे, शारदा बनसोडे, रेखा बनसोडे, ममता सोनकांबळे, डॉ. कल्पना किनीकर, डॉ. रेखा रेड्डी, सुमन कलंत्री, नूतन केंद्रे, महानंदा सोनटक्के, श्रद्धा सोनटक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्यव सांस्कृतिक विभाग लातूर अभिजीत औटे, उर्मिला वाघमारे, संगीता गुमनार, मधुमती कनशेट्टे, आशा रेड्डी, काजल मिरजगावे, प्रीती कवटीकवार, वर्षा कांबळे, वैशाली कांबळे, सुनीता तेलंगे, चंचला हुगे सह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या शहरातील प्रत्येक प्रभागात व ग्रामीण भागात फिरत आहेत. यावेळी महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
चौकट
ना. बनसोडे यांनी, शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविल्या, आतापर्यंत मतदारसंघातील ९१ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असून केलेल्या विकासकामांमुळे व लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे ते मताधिक्याने निवडून येणार असून त्यांच्या या विजयाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन शिल्पा बनसोडे यांनी केले.