काँग्रेसच्या नेत्या ललिता झिल्ले आपल्या समर्थकासह महायुतीत दाखल
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदार संघाच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस पक्षामध्ये मोठी पडझड सुरू झाली आहे. एकापाठोपाठ एक कार्यकर्ते आणि नेते महायुतीमध्ये दाखल होत आहेत. हे चित्र पाहिल्यास महायुतीच्या उमेदवाराचे पारडे भक्कम होत असल्याची चर्चा गावागावातून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या पाठोपाठ आता काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस राहिलेल्या उषाताई कांबळे यांनी ना. संजय बनसोडे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर लागलीच काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या ललिताताई झिल्हे यांनी अनिता लोहकरे, राजश्री मिरकले, लक्ष्मी तेलंग, भामा वाघमारे यांच्यासह दशरथ लोकरे, माधव वाघमारे, सुनील गायकवाड, संतोष झिल्ले या आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष दिपाली औटे, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे ,माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे, माजी आमदार गोविंद केंद्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गेले कित्येक वर्षापासून ललिता झिल्हे या काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून कार्य करत होत्या. मात्र ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम मतदानावर होणार असल्याचे बोलले जात आहे. एका अर्थाने महाविकास आघाडीला हा मोठा फटका समजला जात आहे.