खर्च निरिक्षक यांनी केले मतदारांना जाहीर आवाहन
अहमदपूर (गोविंद काळे) : २३६- अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवीत असलेल्या सर्व उमेदवार यांच्या दिनांक १७/११/२०२४ वार -रविवार वेळ-सांय.४:०० वाजता, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अहमदपूर येथे खर्च निरीक्षक माननीय श्री प्रसांत कुमार काकराला (आय आर एस) यांनी उमेदवाराच्या खर्चाची तृतीय तपासणी केली.
उमेदवारांनी प्रचारासाठी वापरत असलेल्या विविध गाड्या, मतदान केंद्रावर नेमलेले प्रतिनिधी, मतदान केंद्र बाहेर लावलेले टेबल, खुर्ची व टेंट ईत्यादी सर्व बाबी खर्चामध्ये घेण्यात याव्या अशा सुचना देण्यात आली.
२०नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. प्रचार हा अंतिम टप्प्यात असून मतदाराला विविध प्रकारचे प्रलोभने दाखवण्यासाठी मद्य वाटप, पैशाचे वाटप, विविध प्रकारच्या भेटवस्तू वाटप या सारख्या अनाधिकृत प्रकारचा वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे प्रकार आढळून आल्यास नागरीकांनी या बाबतची माहिती निवडणूक खर्च निरिक्षक प्रसांत कुमार काकराला यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9270154584 या क्रमांकावर अथवा सी- व्हीजील पोर्टलवर नोंदवावी. असे आवाहन निवडणूक खर्च निरिक्षक मा.प्रशांत कुमार काकराला यांनी केले आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे,संपर्क अधिकारी ज्ञानोबा मुके , सहाय्यक खर्च निरीक्षक बी बी सपकाळ, नोडल अधिकारी नागेश बुद्धिवंत ,सहा.खर्च नोडल अधिकारी जी एन गोपवाड उपस्थित होते.