विवाह सोहळ्यात हजारो मतदारांना स्वीप पथकाने दिली मतदान करण्याची शपथ
अहमदपूर (गोविंद काळे) : लोकशाहीचा महापर्व २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत दि १७ रोजी दुपारी वर्षा गार्डन अहमदपूर येथे मोरे व नळगीरे परिवार तर शांताई मंगल कार्यालय लातूर येथे चवळे व बिडवे परीवाराच्या विवाह सोहळ्यात तहसील कार्यालयाच्या स्वीप पथकाने केली मतदान जनजागृती.
या विवाह सोहळ्यातील वधु-वर यांच्यासह पालक,नातेवाईक,पाहुणे मंडळींना तहसील कार्यालय अहमदपूरच्या वतीने स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,कपिल बिरादार,प्रा.शिवशंकर पाटील,शिवकुमार गुळवे,बस्वेश्वर थोटे,विवेकानंद मठपती यांच्या उपस्थितीत पाहुण्यांना स्वीप सदस्य कपिल बिरादार यांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठीची शपथ दिली.तसेच मतदान जनजागृती चे बँनर हातात घेऊन मंडपातील मतदार बंधूना विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी आपला हक्क बजवावा.आपल्या कुटुंबातील प्रत्येक मतदारांनी इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावे असे आवाहन केले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर,सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,तहसीलदार उज्वला पांगरकर,नरसिंग जाधव शिक्षणाधिकारी नागेश मापारी,गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती करण्यात येत आहे.