अहमदपूर,शिरुर ताजबंद व किनगाव आमदार बाबासाहेब पाटलांच्या रॅलीला अभूतपुर्व गर्दी

0
अहमदपूर,शिरुर ताजबंद व किनगाव आमदार बाबासाहेब पाटलांच्या रॅलीला अभूतपुर्व गर्दी

अहमदपूर,शिरुर ताजबंद व किनगाव आमदार बाबासाहेब पाटलांच्या रॅलीला अभूतपुर्व गर्दी

अहमदपूर (गोविंद काळे) : आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रचार रॅलीला जनतेचा अभूतपुर्व पाठींबा मिळाला असून निघालेल्या रॅलीमुळे आमदार बाबासाहेब पाटीलच नंबर एकवर असल्याची चर्चा चौकाचौकात रंगली.
आमदार पाटील यांनी सतत पाठपुरावा करुन अंतेश्वर बंधार्‍याचे पाणी अहमदपूर-चाकुर तालुक्यातील अनेक गावांना मिळणार असल्याने शेतीला बारमाही पाणी मिळणार असल्याने शेतकरी खुष ,लाडकी बहिन योजने मुळे महिला खुष,सन २०२४-२५ खरीप हंगामातील शेतकर्‍यांना अनूदान मंजूर ,मागील वर्षाचा रब्बी पिकाचा पिक विमा मिळाला असल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत असून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर रडणार्‍या पेक्षा लढणारा आमदार बाबासाहेब पाटीलच चांगला अशी जनतेतून प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.तसेच मतदार संघातील ट्रामाकेअर सेंटर असेल अहमदपूर,शिरूर ताजबंद,किनगाव येथील बसस्थानक दुरूस्ती व सुशोभिकरणाचे काम असो अहमदपूर चाकुर तालुक्यातील नागरिक खुष असल्याने यावेळी पण आमदार पाटील यांना आमदार करणार असल्याचे रॅलीतील गर्दीतून दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असताना विविध विकासकामे मार्गी लावली असून यासाठी त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात सकारात्मकता आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अहमदपूर, शिरूर ताजबंद व किनगाव या ठिकाणी पदयात्रा आयोजित करून सुरू झालेल्या प्रचाराची सांगता केली.
यावेळी नागरिकांचा प्रचंड जनसमुदाय आणि त्यांचे आशीर्वाद यामुळे आ. पाटील यांचा विजय पुन्हा एकदा निश्चित मानला जात आहे.
किनगाव गावातून सचिन भाऊ साठे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेना तालुकाध्यक्ष गोपाळभाऊ माने, रिपाई जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, माजी सभापती करीम साहेब गुळवे, मा. जि. प. सदस्य अशोक काका केंद्रे, त्र्यंबक आबा गुट्टे, किशोर बापू मुंडे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, तालुका अध्यक्ष भाजप वसंतराव डिगोळे, रिपाई तालुकाध्यक्ष पप्पनराव कांबळे, नगराध्यक्ष कपिल भैया माकणे, मा. जि. प. सदस्य सुदर्शन मुंडे, मिलिंदराव महालिंगे, ह. भ. प. सूळ महाराज, सय्यद मुर्तुझा, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यशवंतराव जाधव, तुकाराम मद्दे, उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार, नितीन रेड्डी, ॲड. भारत भाऊ चामे, इलियास सय्यद, मुजीब पटेल जहागीरदार, महंमद सय्यद, मुजमील सय्यद, संचालक राहुल सुरवसे, भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, साई हिप्पाळे, भानुदासराव पोटे, बाळूभाऊ लाटे, ॲड. टी. एन. कांबळे, पद्माकरराव पाटील, बाबुभाई रुईकर, दयानंदराव सूर्यवंशी, दयानंदराव पाटील, गणी बागवान, मधुकरराव मुंडे, विष्णुकांत तिकटे, ॲड. संतोष गंभीरे, भागवत गुट्टे, तुकाराम तेलंगे, संदीप शेटे, सागर भैया होळदांडगे, सुरज शेटे, बिलाल पठाण, खंडेराव वाघ, किरण गायकवाड, किशन गौंडगावे, सिद्धेश्वर अंकलकोटे, मधुकर कांबळे, आशिष तोगरे, ॲड. आशिष वाघमारे आदी उपस्थित होते.
रॅलीमुळे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार आमदार बाबासाहेब यांची प्रचंड पक्कड मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *