कोरोना काळात कव्हेकर साहेबांकडून जनसामान्यांना मदतीचा हात..!

कोरोना काळात कव्हेकर साहेबांकडून जनसामान्यांना मदतीचा हात..!

‘कोरोना’ या विश्‍वव्यापक महामारीच्या संकटात महाराष्ट्रासह अवघा भारत कोरोनाच्या महामारीने ग्रासला मानवी श्‍वासाला ग्रहण लागते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक उंबरठ्यावरती भयाचं प्रचंड सावट घोंगावताना दिसत होतं. जनमानसातला कोलाह आणि गावा-शहरातून धगधगणार्‍या चिता आणि स्मशानामध्ये अहोरात्र उसळलेला आगडोंब पाहून मानवी मन विषण्ण झालं होतं. अशा दुर्दैवाच्या  दशावताराने कोरोनाचा सैतानी नाच सर्वत्र पहावयास मिळत होता. वार्धक्याने जर्रर झालेली माणसे आणि दुसर्‍या लाटेत ऐन उमेदितली घरगाड्याची दोरी ज्यांच्या हातात होती ती तरूणाई ऑक्सीजनच्या अभावी आकाशाकडे डोळे लावून पृथ्वीतलाचा निरोप घेत स्वर्गात पोंहचत होती. मृतकाच्या कुटुंबात दुखःच्या छायेखाली वावरणारे विमनस्क अवस्थेतील माणसे आणि हातबल झालेली वैद्यकीय यंत्रणा आणि समाज हे सर्व दुखः खुल्या डोळ्यांनी पाहत होता. परंतु अशा परिस्थितीत काही माणसं सामाजिक उत्तरदायित्त्वाची मशाल हृदयामध्ये घेवून सामाजिक दुखःवर फुंकर घालून कोरोना काळात समाजाच्या मदतीसाठी तत्परतेने पुढे आली. त्यामध्ये लातूरचे माजी आ.लोकनेते मा.श्री.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब व भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचाही समावेश होतो. ज्यांची उभी हयात लोकसेवा आणि गरीबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी समर्पित झाली. त्या मा.कव्हेकर साहेबांनी कोरोना काळामध्ये वैज्ञानिक आणि वैद्यकीय जाणिवांच्या निर्देशानुसार लोकजागृती आणि मदत कार्य यामध्ये आपले अतुलनीय योगदान दिले. यामध्ये सर्वप्रथम जनतेला धीर देण्याचे कार्य प्रामुख्याने करण्यात आले.

1. मास्क वाटपः- कोरोना हा मुख्यतः नाक आणि तोंड यामधून पसणारा आजार असल्या कारणामुळे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार प्रत्येकाने मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्यामुळे मास्क वापरण्याची लोकजागृती करण्याबरोबर कव्हेकर साहेबांनी स्वतः हजारो मास्क गरजू आणि गरीब जनतेला विनामुल्य वाटप केले. आणि मास्क वापरणे ही काळाची गरज आहे. हे पटवून दिले. यासाठी त्यांनी सोशल मिडीयाचा वापर करून थेट ऑनलाईन जनतेशी संवाद साधला त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यासाठी रात्रंदिवस ते स्वतः प्रयत्नशील राहिले, यातूनच एका मुसद्दी राजनेत्याची समाजाप्रती तळमळ दिसून येते.

  1. रूग्णवाहिका ः- कोरोना काळात एककीकडे सर्वत्र रूग्णालयामध्ये बेड हाऊसफुल्‍ल झाले असताना जे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत होते त्यांना रूग्णालयापर्यंत तात्काळ पोंहचवून उपचार सुरू करण्यासाठी मा.कव्हेकर साहेब व युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी काळाची गरज ओळखून स्वखर्चातून लातूर मनपाकडे एका रूग्णवाहिकेचे लोकार्पण  केले. आणि समाजाप्रती आपले उत्तरदायित्त्व सिध्द केले.
  2. ऑक्सीजन सेवा ः-कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये संपूर्ण लातूर शहर आणि जिल्हा भरडून निघत असताना ऑक्सीजनविना तडफडणारे जीव पाहून मा.कव्हेकर साहेबांचे मन अस्वस्थ होत होते. यातूनच त्यांनी आपल्यापरीने समाजासाठी आणि रूग्णांचे जीव वाचविण्यासाठी स्वखर्चातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही अत्याधुनिक मशीन लोकार्पीत केली. आणि प्रत्यक्ष रूग्णांच्या घरी कॉन्सन्ट्रेटर पोहचवून रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला. हे एका अर्थाने फार मोठे पुण्यकर्म होय.
  3. मोफत अन्‍नधान्य किट ः- कोरोना काळात सतत लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता, गरीब मजूर, रोजंदारीवरील कामगार आणि हातावर पोट असणारे मजूर यांचे प्रचंड हाल होत होते. लॉकडाऊनमुळे उत्पन्‍नाचे सर्व साधणे बंद असल्याने सर्वसामान्यांवर आर्थिक संकट कोसळले होते या सर्व बाबींचा सहनुभूतीपुर्वक विचार करून मा.कव्हेकर साहेबांनी दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या गहू, ज्वारी, तांदूळ, तेल, तयार पीठ, मीठ, मसाला सर्व प्रकारचे दैनंदिन वापरातील मसाले, शुध्द पेयजल आरोग्यासाठी साबण, टुथपेस्ट व गृहउपयोगी आणि नित्यउपयोगी वस्तूंचे जवळपास 6 हजार कीट मोफत वाटप करून प्रत्यक्ष गरजूंच्या घरापर्यंत पोहचविले.  यातूनच त्यांची जनसेवेची व्रतस्थ तळमळ दिसून येते.
  4. मोफत अन्‍नसेवा ः- भारतीय संस्कृतीत अन्‍नदान हे सर्वात मोठे दान व पुण्यकर्म समजले जाते. कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये असलेल्या रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकासाठी लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद परिस्थिती असल्याने त्यांच्या जेवणाचे हाल होत होते. यावर उपाय म्हणून मा.कव्हेकर साहेब यांच्या मार्गदर्शन आणि सुचनेनुसार भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.अजितसिंह पाटील कव्हेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कोरोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तब्बल दिड महिना दररोज हजारो रूग्ण  व नातेवाईकांना स्वच्छ, ताजे, शिजवलेले पोष्टीक अन्‍न व बिसलेरी पाणी उपलब्ध करून देण्यात आले. हे कार्य म्हणजे लोकसेवेच्या सामाजिक कार्यातला दिपस्थंब ठरावा इतके गौरवन्वित आणि अभिनंदणीय कार्य आहे.
  5. हेल्पलाईन सेवा ः-  कोरोना काळात कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आला म्हटले की, रूग्ण आणि रूग्णांच्या कुंटुंबात प्रचंड भीती आणि मानसिकदडपण येऊन रूग्ण अस्थिर व्हायचे रूग्णांना पॉझिटिव्ह आल्यांनतर काय करावे? कुठे जावे? यासाठी त्यांचा सर्वत्र गाेंंधळ उडालेला असायचा अशा परिस्थितीत रूग्णांना मानसिक धैर्य देवून शहरात कोणत्या ठिकाणी, कोणत्या रूग्णालयात बेड्स उपलब्ध आहेत. कोणत्या तपासण्या गरजेच्या आहेत? रेमडेसेवीर इंजेक्शनची गरज असल्यास प्रशासनाशी कसा संपर्क करायचा? या सर्व बाबी मा.कव्हेकर साहेबांनी मा.कव्हेकर अजित भैय्या साहेबांनी भाजपयुमो च्या सर्व कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष रूग्णांशी हेल्पलाईनद्वारे संवाद साधून रूग्णसेवेचा उपक्रम यशस्वीरित्या राबविला. यामुळे रूग्णांना कमी वेळेत योग्य रूग्णालयात पोहंचणे शक्य झाले. ही सेवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हेल्पलाईनद्वारे राबविण्यात आली. यामुळे हजारो रूग्ण व नातेवाइकांना कोरोना काळात मदतीचा आधार मिळालेला आहे.  
  6. वृक्षारोपन ः- मा.कव्हेकर साहेब हे सदैव दुरदृष्टीचा सम्यक विचार करतात याचा परिचय त्यांनी केलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातून येतो. ऑक्सिजन ही श्‍वासासाठी लागणारी कायमस्वरूपी बाब असल्याने कायमस्वरूपी ऑक्सिजन पुरवठा व्हावा, यासाठी मा.कव्हेकर साहेबांनी नैसर्गिक ऑक्सिजनचेे स्त्रोत निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपनाचे कार्यक्रम घेवून हजारो वृक्षांचे रोपन केले. यातूनच मा.कव्हेकर साहेबांची दुरदृष्टी दिसून येते.
    एकंदरीत वरील सर्व बाबींचा विचार करता कोरोना काळ हा सर्वांसाठी कर्दनकाळ ठरत होता, पंरतु अशा कठीण काळात लोकसेवा हीच ईश्‍वरसेवा समजून मा.कव्हेकर साहेब अहोरात्र लोकसंपर्कात आणि लोकसेवेत होते. जीवनाच्या निष्ठा या लोकांच्या प्रती अर्पिल्या की समर्पणाचा नंदादीप प्रज्वलीत होतो. कव्हेकर साहेबांनी आयुष्यातला प्रत्येक श्‍वास लोकांसाठी अर्पिला आपल्या जीवनाचं ध्येय हे गरीबांची सेवा आणि कल्याण करण्यात  आले हा बाणा घेवून कव्हेकर साहेबांनी कोरोनाला हारविण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आणि सहकार्‍यांसह एक लोकसेवेचा दिपस्तंभ निर्माण केला. या दिपस्तंभाचा प्रकाश सदोदीत दैदिप्यमानपणे प्रकाशीत राहील. साहेबांच्या या कार्यामुळे जनसामान्याचा आशीर्वाद सदैव साहेबांच्या पाठीशी राहील, हे मात्र निश्‍चित.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!