पंचायत राजमधून यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली – प्रोफेसर अनिल मुंढे
अहमदपूर (गोविंद काळे) : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात करून महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला नवी दिशा देण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे संयोजक प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे महाराज यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर प्रो. डॉ. अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पुढे बोलतांना प्रो. डॉ. अनिल मुंढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे शिल्पकार तर होतेच पण देशावर संकट आल्यानंतर हा सह्याद्रीचा वाघ हिमालयाच्या रक्षणासाठी धावून गेला, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय तसेच साहित्यिक कार्यावर ही प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यक्रमाधिकारी डॉ. बी.के. मोरे यांनी केले तर आभार संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी.डी. चिलगर यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, प्रो. डॉ. नागराज मुळे , डॉ. सतीश ससाणे, डॉ. डी. एन. माने ,डॉ. सचिन गर्जे, डॉ.प्रशांत बिरादार, प्रा. प्रकाश गायकवाड, डॉ. सीमा उपलवार , प्रा. के. आर. कदम , प्रा. प्रतीक्षा मंडोळे, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापूरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.