माणसाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचे अधिकार संविधानामुळेच मिळाला – डॉ. पी. डी. चिलगर
अहमदपूर (गोविंद काळे) : संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ती राष्ट्राची अस्मिता व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची आणि माणसाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारी संहिता म्हणजे भारतीय संविधान आहे त्यामुळे असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील हिंदी विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.पांडुरंग चिलगर यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले ‘राष्ट्रीय संविधान दिन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी होते तर डॉ. पांडुरंग चिलगर यांचे प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची तसेच भारतीय संविधानांचे पूजन करण्यात आले. तसेच मुंबईत झालेल्या 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. चिलगर म्हणाले की, स्वातंत्र्य , समता, बंधुत्व आणि न्याय या तत्वाने तयार झालेल्या भारतीय संविधानामुळे आज भारताची एकात्मता टिकून आहे आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताने यशस्वीरित्या नावलौकिक मिळविला आहे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी म्हणाले की, भारतीय संविधानात भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा समन्वय असून कायद्याचे राज्य निर्माण करणारी संहिता आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी केले तर आभार प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांनी मानले. यावेळी डॉ. मारोती कसाब , प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर,अजय मुरमुरे , चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापूरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.