सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुधा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संचालक कुलदीप हाके पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होते. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक कुलदीप हाके पाटील यांनी केले.
कार्यक्रमात बोलताना साविधानाचे महत्व आणि उपयोग विद्यार्थ्यांना सविस्तर समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रात्साविक व संचालन श्री गणेश कोईलवाड सर यांनी केले. संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये सामुहिक संविधान वाचन , सविधानाचे महत्व याविषयावर निबंध स्पर्धा , आपला भारतदेश आणि संविधान हि थीम समोर ठेऊन चित्रकला स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली तसेच आपले मुलभूत हक्क आणि मुलभूत कर्तव्यांची जाणीवही त्यांना करून देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक आर . हरिदास सर यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.