यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांना नुकतीच ‘लोकप्रशासन ‘या विषयात पी. एच. डी. पदवी मिळाल्याबद्दल व त्यांनी आतापर्यंत २५ हून अधिक पदव्या संपादन केल्याबद्दल अहमदपूर येथील अंनिस कार्यकर्ते यांच्यावतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला. डॉ बबन जोगदंड बोलताना जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर मोठी स्वप्न पाहावीत, त्याचबरोबर संवाद कौशल्य, इंग्रजी भाषा, तंत्रज्ञान, आत्मविश्वास आणि कष्ट ही पंचसूत्री जीवनामध्ये अंगीकारावी, असे आवाहान यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोस्ट मास्तर भालचंद्र आलापुरे. नांदेड जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, नांदेड जिल्हा परिषदचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे हे होते तर या वेळी मेघराज गायकवाड. जोगोलकिशोर शार्म. पुजा गायकवाड. संतोष जावळे. आत्माराम गुटे.डि जे वाघमारे.धीरज कांबळे. दयानंद जाधव.शिवहार कसनुरे .यांची उपस्थिती होती.