उदगीर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात आ.संजय बनसोडे यांना मंत्रीपद मिळावे म्हणून साकडे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते विकास पुरुष आ. संजय बनसोडे यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मंत्री मंडळात संधी मिळावी म्हणून उदगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते युवा उद्योजक बाळासाहेब पाटोदे यांच्या वतीने उदगीर शहरातील लक्ष्मी नारायण मंदिरात आरती करुन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना युवा उद्योजक बाळासाहेब पाटोदे यांनी उदगीर मतदार संघाची ओळख जगामध्ये केवळ आ. संजय बनसोडे यांच्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामुळे झाली असून उदगीरच्या विकासाचा रथ असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी उदगीर, जळकोट मतदार संघाचे आ. संजय बनसोडे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी देऊन त्यांचा सन्मान करावा. अशी अपेक्षा बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी वसंत पाटील, नवनाथ गायकवाड, शिवाजी भोळे, ॲड.वर्षाताई पंकज कांबळे, सतिश पाटील मानकीकर, मदन पाटील, अंकुश ताटपल्ले, पंकज कालाणी, विजय बामणीकर, अजित फुलारी, संदीप बिरादार, गोविंदराज बिरादार, दत्तात्रय भोसले, परमेश्वर मोरे, बालाजी नादरगे, आदित्य मोरे, ज्ञानेश्वर श्रीमंगले, अमोल पाटील, राम बिरादार, आदी उपस्थित होते.