केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात स्वा.सावरकर माध्यमिक विद्यालयाचे यश
उदगीर (प्रतिनिधी) : शिक्षण विभाग,पंचायत समिती उदगीर जि.लातूर च्या अंतर्गत जि.प. केंद्रीय प्रा.शा.हंडरगुळी ता.उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या 52 व्या केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात स्वा.सावरकर माध्यमिक विद्यालय सुकणी या शाळेने हर्बल क्वाईल मच्छर पळविणे हा प्रयोग करून दाखवला व माध्यमिक गटात द्वितीय क्रमांक मिळवून त्याची तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.यात मुळे साक्षी ज्ञानोबा ,सुकणे श्रुती हणमंत,सबासारे श्रद्धा अंकुश या विद्यार्थ्यांनीच हा प्रयोग यशस्वी केलेला आहे.तरी त्यांना श्री गंगोत्री आर.के यांचे मार्गदर्शन झाले.या यशाबद्दल संस्थेचे सचिव सुनिल रामराव सुकणे,व मुख्याध्यापिका सौ.मिरा सुनिल सुकणे यांनी कौतुक केले.तसेच शिक्षकवृंद कांबळे एम.एस, मुळे के.के, इंचुरे टी.एन, डोईफोडे एस.जी, गव्हाणे एच.पी, गोणपाट जी.आर.व ग्रामस्थानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.