मातृभूमी नर्सिंग स्कूल सामान्य रुग्णालयाच्या वतीने एड्स निर्मूलन जनजागृती रॅली
उदगीर (प्रतिनिधी) : जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी नर्सिंग स्कूल व सामान्य रुग्णालयाच्या वतीने शहरातून जनजागृती रॅली काढली. रॅलीची सुरुवात सामान्य रुग्णालय येथे करत नगरपरिषद कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जात समारोप सामान्य रुग्णालय परिसरात करण्यात आला. यावेळी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक,डॉ. पी. के. दोडके
डॉ. एस. एस. सोनवणे. नोडल अधिकारी ए आर टी डाँ गौतमी वीर, वैद्यकियआधिकारी एआरटी, शशिकांत महालिंगे,उमाकांत कांबळे, रणजित पाटील, मारोती सोनकांबळे, प्रिंयंक चव्हाण , शुभांगी पाटील, राजकुमार सोमवंशी,बालाजी गायकवाड, मायि बोळेगावे,सुरेखा इंगळे मातृभूमी नर्सिंगस्कूलचे राहुल जाधव, लखाते प्रतिक्षा ,मर्ढे अंकाता आदी उपस्थित होते. यावेळी मातृभूमी नर्सींग स्कुलचे विद्यार्थी उपस्थित होते.